नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.१७) शेतकऱ्यांना दिवाळीची भेट दिली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १२ वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे.https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-दापोली-नगर-पंचायतीत-५-को/
पंतप्रधानांनी केलेल्या एका क्लिकनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाइन ही रक्कम जमा झाली. पंतप्रधान मोदी यांनी १६ हजार कोटींचा PM-KISAN निधी जारी केला आहे. PM-KISAN अंतर्गत आत्तापर्यंत २ लाख कोटी रुपये वितरीत केले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी आज (दि. १७) पंतप्रधान पीएम किसान सन्मान संमेलन २०२२ चे उद्घाटन केले. या दरम्यान त्यांनी किसान सन्मान योजनेची रक्कम एका क्लिकवर वितरीत केली.https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-निवळी-जयगड-मार्गावरील-ओ/
पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थी शेतकर्यांच्या बँक खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये जमा केले जातात. ३ हप्त्यात ४ महिन्यांच्या अंतराने दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात. यंदा दिवाळीआधी पीएम सन्मान निधीच्या १२ व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.


