मुबंई- एसटी महामंडळानेही आता काळाची पावले ओळखून हायटेक होण्याचा निर्णय घेतला आहे. परिवर्तन बसेसची जागा घेणाऱ्या नव्या साध्या श्रेणीच्या 500 बसेस कंत्राटी तत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी दिवाळीच्या मुहूर्तावर पहिल्या टप्प्यात 110 बसेस दाखल होणार आहेत. या बसेस मोठय़ा आकाराच्या आणि चांगल्या ऐसपैस असून त्यांची आसने मऊ गादीची असणार आहेत.
एसटी महामंडळाने भाडेतत्त्वावर 500 बसेस घेण्याचा निर्णय घेतला असून या बसेसपैकी 110 बसेस लागलीच ऐन दिवाळीत दाखल होत आहेत. या बसेसची मालकी, चालक, डिझेल व देखभाल आदी सर्व बाबींची जबाबदारी कंत्राटदारावर राहणार आहे. या बसेस मुंबई ते रत्नागिरी, रायगड आणि कोल्हापूर मार्गावर चालविण्यात येणार असून त्या साध्या दरात चालविण्यात येणार आहेत. पुणे व सांगली विभागासाठी प्रत्येकी 60 बसेसची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून वर्षअखेरीस या 120 बसेस दाखल होणार असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.
Home महाराष्ट्र Maharashtra: एसटीच्या ताफ्यात दिवाळीच्या मुहूर्तावर 110 खासगी बसेस, मुंबई ते रत्नागिरी, रायगड,...


