प्रतिनिधी- पांडुशेठ साठम
कुडाळ- आमदार वैभव नाईक यांच्यावर अलीकडेच एसीबी कारवाईने केली होती. आमदार वैभव नाईक यांच्यावर सूडबुद्धीने झालेल्या एसीबी कारवाईच्या निषेधार्थ आणि अघोषित आणीबाणीच्या विरोधात आणि हजारोंच्या उपस्थितीत आज कुडाळात भव्य मोर्चा काढण्यात आला. आज सकाळीच पावसाने हजेरी लावली तरीही जनता उत्स्फूर्तपणे मोर्चात सहभागी झाली होती.https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-निवळी-जयगड-मार्गावरील-ओ/
‘शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, उद्धवसाहेब, आदित्यसाहेब ‘तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है,’ महाविकास आघाडीचा विजय असो, ‘आ.वैभव नाईक साहेब तुम आज बढो हम तुम्हारे साथ है!’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. कुडाळ शिवसेना शाखा ते एसीबी कार्यालय कुडाळ पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. हातात भगवे झेंडे, डोक्यावर भगवी टोपी, हातात वैभव नाईक यांच्या समर्थनाचे फ्लेक्स घेऊन शिवसैनिक मोठ्या उत्साहात मोर्चात सहभागी झाले होते. त्यानंतर एसीबी कार्यालयात निवेदन देण्यात आले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी,कार्यकर्ते देखील मोर्चात सहभागी झाले.
यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत,शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव,शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर,शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत,कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर,शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,सिंधुदुर्ग जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत,शिवसेना जिल्हास्तरीय नेते संदेश पारकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख, महिला जिल्हाप्रमुख सौ.जान्हवी सावंत,महिला जिल्हाप्रमुख सौ.नीलम पालव,युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, अमरसेन सावंत,राजू शेट्ये,राजन नाईक, हरी खोबरेकर, बाळा गावडे,अभय शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत मोर्चा संपन्न झाला.

