वेंगुर्ला प्रतिनिधी- होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज समोर वेंगुर्ला-मठ रस्त्यावर बुधवारी रात्री दुचाकीस्वराने पादचा-याला ठोकरुन अपघात केला. या अपघातात वेंगुर्ला पेट्रोल पंप येथे टायर पंक्चरचा व्यवसाय करणारे सी राजन नायर (अण्णा) हे गंभीर जखमी झाले. तर दुचाकी स्वार हा सुद्धा जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद वेंगुर्ला पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-मुकेश-अंबानींनी-घेतलं-न/
वेंगुर्ला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्री. नायर हे बुधवारी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास आपला व्यवसाय बंद करून चालत घरी निघाले होते. त्याच दरम्यान वेंगुर्ला येथून मठच्या दिशेने दुचाकी क्र. एमएच-०७-एक्यू-२९६५ वरील चालक चंदन सुहास परुळेकर रा. मठ-परबवाडी हा भरधाव वेगाने जात होता. वेगामध्ये त्याने रस्त्याने चालणा-या श्री. नायर यांना मागून जोरदार धडक दिली. नायर यांच्या पायाला पायाला मोटरसायकल आपटल्याने त्यांना मोठी दुखापत झाली. तर दुचाकीस्वार खाली कोसळला. त्यालाही दुखापत झाली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी अपघाताची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोघांना वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून नायर यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे तर दुचाकीस्वार परूळेकर याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. https://sindhudurgsa
machar.in/goa-गोवा-रेडक्रॉसतर्फे-सेवा/
दरम्यान वेंगुर्ला पोलीस ठाण्यात मोटर वाहन अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भगवान चव्हाण करत आहेत.


