Maharashtra: अंगणवाडी ताईंचे मानधन दोन-अडीच हजारांनी वाढणार

0
536
अंगणवाडी सेविकांसाठी १२वी उत्तीर्णची अट! २६ जानेवारीनंतर २० हजार पदांची भरती

प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर

मुंबईअंगणवाडी ताईंचा दरवर्षीचा भाऊबीज मिळविण्याचा व मानधन वाढीचा संघर्ष आता कायमचा दूर होणार आहे. त्यांच्या मानधनात आता दोन-अडीच हजार रुपयांची मानधन वाढ प्रस्तावीत असून काही दिवसांत त्यावर अंतिम निर्णय होईल. महिला व बालकल्याण विभागाकडून हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. https://sindhudurgsamachar.in/bollywood-अभिनेता-सलमान-खान-याच्य/

महागाई वाढली, काम वाढले पण अंगणवाडी ताईंचे मानधन तेवढेच राहीले. मात्र अंगणवाडी ताईंच्या मानधनाचा प्रश्न आता सरकारने दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी ताईंचा संसार तथा उदरनिर्वाह दरमहा मिळणाऱ्या साडेसात हजारांच्या मानधनावरच चालतोय. शासन सांगेल ते काम अचूकपणे करणाऱ्या अंगणवाडी ताईंना मानधन कमी आणि प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षकांना लाखोंची पगार अशी वस्तुस्थिती आहे. काही वर्षांपासून अल्प मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी संघर्ष केल्यानंतर त्यांना दिवाळीत भाऊबीज म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जातात. आता ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली आहे. पण, त्यांचे मानधन वाढवून अंगणवाडी ताईंना कायमचा दिलासा देण्याचा प्रस्ताव शासनाने तयार केला आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-कुडाळ-मालवणचे-आमदार-वैभ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here