वेंगुर्ला प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत संपूर्ण राज्यात महिलांसाठी तपासणी मोहीम हाती घेतली आहे. शासनाच्या या उपक्रमात सहभागी होत भाजपा महिला मोर्चाने वेंगुर्ला तालुका कार्यालयात महिला तपासणी शिबिर घेतले. https://sindhudurgsamachar.in/manoranjan-वऱ्हाडी-वाजंत्रीची-भन्/
यात वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नाली माने-पवार, आरोग्य सेविका तांडेल मॅडम, आरोग्य सेवक एस.एस.झालबा, हिंद लॅबच्या निलिमा भाटकर, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. श्रवण कुमार आदींनी महिला, माता व गरोदर स्त्रियांची मोफत तपासणी करुन समुपदेशन केले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अॅड.सुषमा खानोलकर, माजी उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर, माजी नगरसेवक श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, महिला तालुका सरचिटणीस वृंदा गवंडळकर, रसिका मठकर, आकांक्षा परब, केतकी खवळे व मराठे उपस्थित होते.


