वेंगुर्ला प्रतिनिधी- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी किल्ले बनविण्यात आले असून वेंगुर्ला शहरातील राऊळवाडा येथील ‘शिवतेज बाल मित्रमंडळाने‘ बनविलेला किल्ला लक्षवेधी ठरत आहे.
शहरात शालेय मुलांनी विविध किल्ले बनवून छत्रपती शिवरायांच्या कार्याला उजाळा दिला आहे. त्यांनी बनविलेल्या किल्ल्यांबाबत नागरिकांकडून मुलांचे कौतुक होत आहे. राऊळवाडा येथे शिवतेज बाल मित्रमंडळानेही किल्ला बनविला असून परिसरातील नागरिक हा किल्ला पहाण्यासाठी हजेरी लावत आहेत. राऊळवाडा येथे किल्ला बनविण्यासाठी अर्जुन देवासी, नचिकेत माडये, नंदिता परब, रणवीरसिह रावळ, श्रवणकुमार देवासी व नंदीत परब या शालेय मुलांनी परिश्रम घेतले.
फोटोओळी – राऊळवाडा येथील ‘शिवतेज बाल मित्रमंडळाने‘ किल्ला बनवून छत्रपती शिवरायांच्या कार्याला उजाळा दिला आहे.

