मुबंई- नोव्हेंबरपासून सरकारने वाहतुकीच्या नियमात बदल केले आहेत. ज्याचे उल्लंघन केल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. हा नियम सीट बेल्टशी संबंधित आहे. वास्तविक, 01 नोव्हेंबरपासून मुंबईत मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीला सीट बेल्ट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. दिल्ली-एनसीआरसह अनेक शहरांमध्ये या नियमाचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.
दिल्लीत 1000 चालान
रस्ता सुरक्षा वाढविण्यासाठी, दिल्ली वाहतूक पोलीस कारच्या मागील सीटवर सीट बेल्ट न लावल्याबद्दल 1,000 रुपये दंड आकारत आहे. या संदर्भात पोलिस सोशल मीडियापासून अनेक ठिकाणी मोहीमही राबवत आहेत. आत्तापर्यंत सीट बेल्ट न लावणाऱ्यांसाठीही मोठ्या प्रमाणात चलन जारी करण्यात आले आहे.
सीट बेल्ट अलार्म अनिवार्य असेल
मागील महिन्यात, रस्ते वाहतूक मंत्रालयाने कार उत्पादकांसाठी मागील सीट बेल्ट अलार्म अनिवार्य करण्यासाठी मसुदा नियम जारी केला. या नियमांच्या अंमलबजावणीनंतर समोरच्या सीटप्रमाणेच मागील सीटसाठीही सीट बेल्ट अलार्म लावणे सक्तीचे केले जाईल.

