Ratnagiri: चिपळूण दुय्यम निबंधक लाचलुचपतच्या जाळ्यात

0
37
दक्षता जनजागृती सप्ताह

चिपळूण- पक्षकाराचे खरेदीखत व हक्कसाेड नाेंदणीसाठी ७ हजारांची लाच घेताना चिपळूण येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील निबंधक अधिकारी व त्याच्या खासगी व्यक्तीला रंगेहाथ पकडले. दुय्यम निबंधक अधिकारी प्रशांत रघुनाथ धाेत्रे (४३, मूळ रा. नातूनगर, ता. खेड) व अरविंद बबन पडवेकर (५६, रा. मुरादपूर चिपळूण) असे ताब्यात घेतलेल्या दाेघांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई बुधवारी सायंकाळी चारच्या सुमाराला घडली.

या प्रकरणातील तक्रारदार हे व्यवसायाने वकील असून, त्यांच्या पक्षकाराचे खरेदीखत व हक्कसोड नोंदणीसाठी लाच मागण्यात आल्याचे उघड झाले. याबाबत लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीचे खरेदीखत व हक्कसोड नोंदणी करण्यासाठी प्रशांत धोत्रे या अधिकाऱ्याने १० हजारांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने २ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार पडताळणी करण्यात आली. त्यानंतर तक्रारदार यांच्याकडे खरेदीखत व हक्कसोड कामाचा मोबदला म्हणून ४,५०० रुपये व यापूर्वीच्या कामाची रक्कम मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तडजोडी अंती दुय्यम निबंधक प्रशांत धोत्रे याच्या वतीने ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अरविंद पडवेकर यास ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपतचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनंत कावळे, संतोष कोळेकर, दीपक आंबेकर, हेमंत पवार आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. प्रशांत धोत्रे १८ ऑक्टोबर रोजी मुंबई येथून चिपळूण येथे रुजू झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here