Vengurla: वेंगुर्ला रेकॉर्ड डान्स स्पर्धेत सोहम जांभोरे, पुजा राणे तर जोडी नृत्यमध्ये एम.जे. ग्रुप प्रथम

0
38

वेंगुर्ला प्रतिनिधी- दिवाळी निमित्त नितीश कुडतरकर यांनी वेंगुर्ला-माणिकचौक येथे आयोजित केलेल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत लहान गटात सोहम जांभोरेमोठया गटांत पुजा राणे तर जोडी नृत्य स्पर्धेत एम.जे.ग्रुप यांनी प्रथम क्रमांक पटकाविले.

स्पर्धेचे उद्घाटन सुनील डुबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. आर.एम.परब, उमेश येरम आदी उपस्थित होते. रेकॉर्ड डान्स स्पर्धेत मोठा गटात ८ स्पर्धकांनी व लहान गटात २५ स्पर्धकांनी तर जोडी नृत्य स्पर्धेत ८ जोड्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अंतरा रगजी, निला यरनाळकर, अॅड.सुषमा प्रभू-खानोलकर यांनी काम पाहिले.

लहानगट प्रथम- सोहम जांभोरे, द्वितीय- निधी खडपकर, तृतीय- स्वरा पावसकर, मोठागट- प्रथम- पुजा राणे, द्वितीय- समर्थ गवंडे, तृतीय- नेहा जाधव, जोडी नृत्य स्पर्धा- प्रथम- एम.जे.ग्रुप, द्वितीय-दिक्षा नाईक-निखिल कुडाळकर, तृतीय-गौरेश गोसावी-समर्थ गवंडे यांनी क्रमांक पटकाविले.

स्पर्धेचे बक्षिस वितरण सामाजिक कार्यकर्ते विवेक कुबल, नितिश कुडतरकर, वृंदा मोर्डेकर, निला यरनाळकर, अॅड.सुषमा प्रभू-खानोलकर, अंतरा रगजी, मयुरी केरकर, भाग्यश्री कुडतरकर, मयुरी माडकर, काजल बहिरे यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेसाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर, नितीन मांजरेकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, बाळा दळवी, विवेक कुबल, प्रणव वायंगणकर, अमोल पेडणेकर यांचे सहकार्य लाभले.

फोटोओळी – वेंगुर्ला रेकॉर्ड डान्स व जोडी नृत्य स्पर्धेतील विजेत्यांसमवेत आयोजक व मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here