Vengurla: वेंगुर्ला येथील रा.कृ.पाटकर हायस्कूल मुख्याध्यापक प्रकाश जाधव सेवानिवृत्त

0
20

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील रा.कृ.पाटकर हायस्कूल व रा.सी. रेगे कनिष्ठ महाविद्यालय तंत्र व व्यवसाय अभ्यासक्रमाचे मुख्याध्यापक प्रकाश जाधव हे प्रदीर्घ ३९ वर्षाच्या यशस्वी सेवेनंतर नियत वयोमानानुसार ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाले. यानिमित्त दहावीच्या १९९३ बॅचचे विद्यार्थी विजय गावडेसंदीप गावडेतुषार कासारविवेक राऊळप्रविण गिरप यांच्या हस्ते त्यांना गणपतीची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला नवनिर्वाचित मुख्याध्यापक आत्माराम सोकटे, सहाय्यक शिक्षक महेश बोवलेकर, स्वप्नाली मुणनकर, शिक्षकेत्तर कर्मचारी विजय सावंत, संध्या वेंगुर्लेकर, रमेश धुमक, सखाराम दाभोलकर, प्रसाद गोसावी आदी उपस्थित होते.

फोटोओळी – मुख्याध्यापक प्रकाश जाधव हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल दहावीच्या १९९३ बॅचचे विद्यार्थ्यांनी त्यांचा सन्मान केला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here