Kokan :वेंगुर्ल्यात पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी चाचणी परीक्षा

0
42
पोलिस भरती

वेंगुर्ला प्रतिनिधी- माजी विद्यार्थी संघ-न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा,  अभिनव फाऊंडेशन-सावंतवाडी आणि किरात ट्रस्टवेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात येत आहेत. या प्रशिक्षण वर्गासाठी ३० मुलामुलींची निवड करून त्यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

या प्रशिक्षण वर्गात निवड ८ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला येथे लेखी चाचणी परीक्षा तर ९ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला कॅम्प मैदानावर मैदानी निवड चाचणी होणार आहे. यासाठी इच्छुकांनी किरात कार्यालय वेंगुर्ला किवा अभिनव ग्रंथालय, सावंतवाडी येथे उपलब्ध असलेले ऑफलाईन नोंदणीचे फॉर्म घेऊन  ते भरुन ५ नोव्हेंबरपर्यंत वरील कार्यालयांमध्ये आणून द्यावयाचे आहे.

अधिक माहितीसाठी समीर घोंगे (९९६००३६१७४) यांच्याशी संफ साधावा. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांमार्फत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here