Kokan: वेंगुर्ला आगारातर्फे धार्मिक यात्रांचे आयोजन

0
34
वेंगुर्ला आगारातर्फे धार्मिक यात्रांचे आयोजन

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला आगारातर्फे नुकत्याच झालेल्या अष्टविनायक यात्रेच्या यशस्वी उपक्रमानंतर दि. ६ नोव्हेंबरला प्रति बालाजीजेजुरी आणि अष्टविनायक यात्रेसाठी बस सोडण्यात येणार आहे. एका प्रवाशासाठी २७०० रुपये आकारले असून एका बसमध्ये ४० प्रवाशांचे नियोजन केले आहे. तर पुढील अष्टविनायक यात्रेची तारीख बुकींगप्रमाणे जाहीर केली जाणार आहे.

दरम्यान, याच आगारातर्फे दि.११ नोव्हेंबर रोजी साडेतीन शक्तिपिठांच्या यात्रेचे आयोजन केले असून यामध्ये कोल्हापूर-महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानी, माहूर-रेणुका मंदिर, वणी-सप्तशृंगी मंदिर आदी धार्मिक स्थळांचा समावेश आहे. यासाठी एका प्रवाशासाठी ४ हजार रुपये आकारण्यात आले आहेत. तर शिर्डी आणि शेगांव या धार्मिक स्थळांसाठी गाड्या सोडण्यात येणार असून यासाठी एका प्रवाशाला ४ हजार रुपये आकारण्यात आले आहेत. भाविकांच्या बुकींगनुसार त्याची तारीख जाहीर केली जाणार आहे.

वरील सर्व यात्रांसाठी रात्रौच्यावेळी रहाण्यासाठी सोय केली जाणार आहे. तसेच प्रवास खर्च अॅडव्हान्स स्विकारण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी या सर्व यात्रांचा लाभ घ्यावा असे आवाहन वाहतुक निरिक्षक निलेश वारंग व आगार व्यवस्थापक शेवाळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here