Kokan: वेंगुर्ला तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डयांवर कार्यवाही न केल्यास आमरण उपोषण

0
19

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला तालुक्यातील चार मुख्य महामार्ग संपूर्ण खड्डेमय झाले असून सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यांवर त्वरित खडीकरण व डांबरीकरण करणे तसेच साईडपट्टी व रस्त्याच्या लगत वाढलेली झाडे तोडून साफ करण्यात यावी. रस्त्यांबाबत कार्यवाही न झाल्यास १८ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ल्यातील सर्व मुख्य रस्त्यांवर आमरण उपोषण केले जाई असा ईशारा वेंगुर्ला रिक्षा संघटनादुचाकी व चारचाकी आणि वेंगुर्ल्यातील जागृत नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

वेंगुर्ला येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वेंगुर्ला-शिरोडा ते रेडी रेवस मार्ग (सागरी महामार्ग), मठ-आडेली, कामळेवीर ते आकेरी तिठ्यापर्यंत, दाभोलीमार्गे तेंडोलीपर्यंत आणि तुळसमार्गे होडावडापर्यंत या तालुक्यातील मुख्य चार रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. वाहनचालक व शाळकरी मुले अपघात होण्याच्या भितीने जीव मुठीत धरुन प्रवास करीत आहेत. रस्त्यांच्या झालेल्या या दुदर्शेवर त्वरित उपाययोजना म्हणजेच खडीकरण आणि डांबरीकरण करुन रस्ते वाहतुकीस सुरळीत करुन द्यावेत. तसेच रस्त्यालगत वाढलेली झाडी तोडून साफ करावी असे नमुद केले आहे. आपल्या या मागण्यांचा विचार न झाल्यास १८ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील सर्व मुख्य रस्त्यांवर आमरण उपोषण करण्यात येईल असा ईशाराही सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे. दरम्यान, उपोषणावेळी झालेल्या नुकसानास किवा अपघातास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील असे म्हटले आहे.

बांधकाम विभागाला निवेदनावर रिक्षा चालक-मालक संघटनेचे तालुका अध्यक्ष एकनाथ राऊळ, चितामणी धुरी, लवू तेरसे, मिलिद निकम, शेखर धावडे, नरेश बोवलेकर, सचिन बागवे आदी संघटनेचे पदाधिकारी तसेच शेखर चोपडेकर, यतिन खानोलकर, राजन करंगुटकर, रविद्र राऊळ,  विश्राम परब, अॅन्थोनी फर्नांडीस, विलास धुरी, श्रीधर भोगले, मोहन कुंडेकर, लक्ष्मण मांजरेकर, फिरोज शेख, ज्ञानेश्वर देवजी, संतोष कोरगांवकर, प्रणय कोरगांवकर यांच्यासह एकूण ४० जणांच्या स्वाक्ष­-या आहेत.

फोटोओळी – तालुक्यातील मुख्य चार रस्त्यांवरील खड्ड्यांवर त्वरित कार्यवाही करुन रस्ता वाहतुकीस सुरुळीत करण्याबाबत रिक्षा संघटनेतर्फे एकनाथ राऊळ व शेखर धावडे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यात निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here