वेंगुर्ला प्रतिनिधी- अतिवृष्टीमुळे वेंगुर्ला-मठ सातेरी मंदिर देऊळवाडी येथील सिध्दार्थनगर रस्त्यावरील संरक्षक भिंत कोसळल्याने येथील सात गावाचा संफ तुटण्याची भीती होती. याची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तत्काळ १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे सात गावाचा मठ गावाशी तुटणारा संफ पूर्ववत रहाणार आहे. या कामाचा शुभारंभ बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या हस्ते झाला https://sindhudurgsamachar.in/vengurla-वेंगुर्ल्याची-ग्रामदेव/.
यावेळी सरपंच दादा ठाकूर, माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे, मारुती वाघे, कांडरकर व गावडे आदी उपस्थितीत होते. सरपंच ठाकुर यांनी गावातील विविध विकास कामाबाबत आमदार दीपक केसरकर यांना निवेदन देण्याकरीता माजरेकर यांच्याकडे सुपूर्द केले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सुरपस्टार-अभिनेते-अमित/
फोटोओळी – सिद्धार्थनगर रस्त्यावरील संरक्षक भित बांधकाम कामाचा शुभारंभ तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या हस्ते झाला.

