वेंगुर्ला प्रतिनिधी- तेजस्वी अबॅकस या अबॅकस प्रशिक्षण संस्थेमार्फत शिरोडा व वेंगुर्ला येथील पहिली ते सातवीच्या मुलांसाठी चार दिवसांच्या अबॅकस वर्कशॉपचे आयोजन केले होते. या वर्कशॉपला चांगला प्रतिसाद लाभला. वेदांत नाईक, मृण्मयी साळगावकर, प्रभाकर कांबळी व वेदश्री उगवेकर या मुलांना चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांना विशेष बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.
दोन्ही ठिकाणी ३० ऑक्टोबरला सुरू झालेले हे वर्कशॉप २ नोव्हेंबर रोजी पूर्ण झाले. चार दिवस चाललेल्या या वर्कशॉपमध्ये दोन्ही ठिकाणी मिळून ४० ते ५० मुलांनी सहभाग घेतला होता. या वर्कशॉपमध्ये मुलांना गणिताशी निगडित वेगवेगळ्या गोष्टी शिकवण्यात आल्या. सहभागी झालेल्या सर्व मुलांना पालकांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र देण्यात आली. तेजस्वी अबॅकसचे संचालक मनोज शारबिद्रे यांनी सर्व विद्यार्थी व पालकांचे आभार मानले.
फोटोओळी – अबॅकसमधील वेदांत नाईक याला बक्षिस देऊन गौरविण्यात आले

