Sindhudurg: रेडी येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
61

वेंगुर्ला प्रतिनिधी- रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रितेश राऊळ मित्रमंडळाच्या वतीने कै.चंद्रकांत उर्फ निलेश राऊळ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ १४ व्या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी ३७ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. उद्घाटन माजी सभापती अजित सावंत व तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर तसेच जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते झाले. 

 यावेळी व्यासपीठावर माजी पंचायत समिती सदस्य मंगेश कामत, चित्रा कनयाळकर, रेडी सरपंच रामसिंग राणे,  शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, आरवली सरपंच तातोबा कुडव, रेडी उपसरपंच नामदेव राणे,  शिरोडा उपसरपंच राहुल गावडे , आरावली ग्रामपंचायत सदस्य समीर कांबळी, रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ.अनु शर्मा, मच्छिमार नेते वसंत तांडेल,  शिवसेना उपविभाग प्रमुख सुनील सातजी,  रेडी तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर राऊळ , रेडी ग्रामपंचायत सदस्य संजू कांबळी  आनंद भिसे, गायत्री  सातोस्कर, श्रीकांत राऊळ, निलेश रेडकर,  फ्रांसीस सोज, अरुण राणे, संदीप धनाजी, ज्ञानेश्वर केरकर, ओमकार कोणाडकर,  उल्हास नरसुले, सावंतवाडी ब्लड बँकचे डॉ. येडवे, प्राजक्ता रेडकर इत्यादी उपस्थित होते.

फोटोओळी – रेडी येथील रक्तदान शिबिरावेळी दात्यांनी रक्तदान केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here