Sindhudurg: वेंगुर्ला-अणसूर येथील फुगडी स्पर्धेत सखी संघ तर वारकरी भजन स्पर्धेत केपादेवी मंडळ प्रथम

0
59

वेंगुर्ला प्रतिनिधी-  अणसूर येथील श्री देवी सातेरी कला क्रीडा मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या ३ दिवसीय भव्य संगीत महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी घेतलेल्या खुल्या फुगडी स्पर्धेत सखी फुगडी संघ पावशी यांनी तर वारकरी भजन स्पर्धेत श्री केपादेवी वारकरी भजन मंडळ, मूठ यांनी विजेतेपद पटकावले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सुरपस्टार-अभिनेते-अमित/

या संगीत महोत्सवाचे उद्घाटन २८ ऑक्टोबर रोजी मंडळाचे कार्याध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक रंगनाथ उर्फ नाथा गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी गोपी गावडे, चंद्रकांत गावडे, सरपंच अन्विता गावडे, उपसरपंच संजय गावडे, सामाजिक कार्यकर्ते सत्यविजय गावडे, गणेश गावडे, विजय सरमळकर, वक्रतुंड ज्वेलर्सचे मालक भाऊ मालवणकर, पांडू गावडे, चंदू गावडे, नारायण ताम्हणकर, मंडळाचे अध्यक्ष नितीन अणसुरकर, उपाध्यक्ष सुनील गावडे, खजिनदार सिद्धेश गावडे,  नारायण गावडे, महादेव  गावडे, बिटू गावडे, कौस्तुभ गडकर, विजय गावडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. उद्घाटन समारंभानंतर नृसिंहवाडी येथील ह.भ.प. शरद बुवा घाग यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले. https://sindhudurgsamachar.in/vengurla-वेंगुर्ल्याची-ग्रामदेव/.

२९ ऑक्टोबर रोजी घेतलेल्या फुगडी स्पर्धेत सिंधुदुर्ग व गोवा येथील नामांकित ९ संघांनी सहभाग घेतला होता. यात सखी फुगडी संघ पावशी यांनी प्रथम, श्री भैरव जोगेश्वरी फुगडी संघ कुडाळ यांनी द्वितीय, ओंकार सिद्धेश्वर फुगडी संघ उभादांडा यांनी तृतीय क्रमांक पटकावले. शिस्तबद्ध मंडळ म्हणून श्री सातेरी फुगडी ग्रुप पेडणे-गोवा, उत्कृष्ट गायक/कोरस म्हणून तारादेवी फुगडी मंडळ केळुस तर उत्तेजनार्थ क्रमांक श्री देव वाटेराम महापुरुष फुगडी संघ पालये-गोवा यांना देण्यात आला. 

तर ३० ऑक्टोबर रोजी घेतलेल्या वारकरी भजन स्पर्धेत नामांकित ९ वारकरी भजन मंडळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत श्री केपादेवी वारकरी भजन मंडळ मूठ-वेंगुर्ला यांनी प्रथम, महापुरुष वारकरी भजन मंडळ निवती यांनी द्वितीय तर दत्तप्रसाद वारकरी भजन मंडळ डिचोलकरवाडी यांनी तृतीय क्रमांक पटकावले. शिस्तबद्ध मंडळ म्हणून श्री देव वेतोबा वारकरी भजन मंडळ कोचरा, उत्कृष्ट पखवाजवादक म्हणून प्रविण उमेश डिचोलकर (दत्तपसाद वारकरी भजन मंडळ), उत्कृष्ट गायक म्हणून गणंजय सावंत (श्री केपादेवी वारकरी भजन मंडळ) तर उत्तेजनार्थ क्रमांक अचानक वारकरी भजन मंडळ वेंगुर्ला यांनी पटकाविला. दोन्ही स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

      या संगीत महोत्सवाचे औचित्य साधून प्रसिद्ध भजनी कलाकार दिप्तेश मेस्त्री व तेजस मेस्त्री यांचा तर पश्चिम बंगाल येथे संपन्न झालेल्या ३१व्या ऑल इंडिया जी.व्ही.मावळंकर शूटिंग चॅम्पिअनशिप (रायफल) स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत ४०० पैकी ३८१ गुणांची नोंद करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के करणा-या वेंगुर्ल्याची कन्या सानिया सुदेश आंगचेकर यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेचे सूत्रसंचालन राजा सामंत व गजमुख गावडे यांनी केले.

फोटोओळी-वारकरी भजन स्पर्धेतील विजेत्या केपादेवी वारकरी भजन मंडळाचा नाथा गावडे यांनी सन्मान केला. सोबत सत्यविजय गावडेसंजय गावडे व इतर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here