ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंनी बाजी मारली आहे. ऋतुजा लटके या पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या. त्यांना 66 हजार 247 इतकी मतं मिळाली आहेत. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर ऋतुजा लटके या भावूक झल्या. ऋतुजा लटके यांनी विजयी झाल्यानंतर ‘हा माझा विजय नसून माझे पती रमेश लटके यांचा विजय आहे. त्यांनी त्यांची जी संपूर्ण राजकीय कारकीर्द होती त्यामध्ये जी जनसेवा केली, विकासकामे केली. त्याची ही पोचपावती मला विजयाने मिळाली आहे. त्यांनी केलेल्या कामाची परतफेड मतदारांनी केली आहे.’, अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर जाणार असल्याचे सांगितले. आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणूक पार पडली होती. या जागेसाठी 3 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीसाठी 31.74 टक्के मतदान झाले होते. तर या निवडणुकीतील ऋतुला लटके यांच्याविरोधामध्ये उभ्या राहिलेल्या सर्व अपक्ष उमेदवारांना खूपच कमी मतं मिळाली. अपक्ष उमेदवार बाळा नडार यांना 1506 मतं मिळाली आहेत.

