Kokan: मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ भीषण अपघात;चार जणांचा जागीच मृत्यू

1
185
कळसुली येथील घरातील दोन कर्ती मुले अपघातात दगावल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ
कळसुली येथील घरातील दोन कर्ती मुले अपघातात दगावल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ

मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ पोलादपूर तालुक्यातमधील कशेडी घाटामध्ये सोमवारी रात्री उशीरा हा भीषण अपघात झाला. रिक्षा आणि डंपरची या अपघातात जोरदार धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती कि रिक्षातील चारही व्यक्तींचा या अपघातात मृत्यू झाला आहॆ. अपघातामध्ये तीन महाविद्यालयीन विद्यार्थींनींचा समावेश आहे. या विद्यार्थीनी माणगाव तालुक्यामधील गोरेगाव येथून रिक्षाने खेडमध्ये परिक्षेसाठी गेलेल्या होत्या. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-भारतीय-लोक-प्रशासन-संस्/

वाळूने भरलेला डंपर आणि रिक्षाची जोरदार धडक झाल्यानंतर रिक्षामधील या विद्यार्थींनीं आणि रिक्षा चालक हे वाळूच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. यामध्ये त्यांनी जागीच प्राण गमावले. या तिन्ही विद्यार्थीनी गोरेगाव येथील असून त्या रिक्षाने प्रवास करत होत्या. परिक्षेसाठी त्या खेड येथे गेल्या होत्या. परीक्षा आटोपून त्या घरी परतत असताना हा अपघात झाला. यामध्ये रिक्षाचालकासह या तिघींचाही दुर्दैवी अंत झाला आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-एसएनडीटी-विद्यापीठात-उ/

अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. उदय सामंत यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली. त्यांनी ट्विट करत म्हटले की, ‘रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील कशेडी घाटात ट्रक आणि रिक्षा यांचा अपघात झाला असून या अपघातात चार व्यक्तींच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.’
.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here