वेंगुर्ला प्रतिनिधी- कोकण भुमी ही कलाकारांची खाण आहे. कोकणातील कलाकारांनी देशात नव्हे तर जगात अटकेपार झेंडा रोवला आहे . कोकणचा सांस्कृतिक वारसा टिकवण्यासाठी भाजपा सांस्कृतिक आघाडीच्यावतीने सांस्कृतीक चळवळ उभी करणार असल्याचे कोकण विभागाच्या सांस्कृतिक आघाडीच्या संयोजिका अक्षया चितळे यांनी सांगितले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-वेंगुर्ला-स्थानक-प्रमु/
दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौ-यावर असलेल्या अक्षया चितळे यांनी वेंगुर्ला तालुका कार्यालयात भेट दिली. त्यावेळी भाजपा सिंधुदुर्गच्यावतीने प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत रत्नागिरी सांस्कृतिक आघाडीच्या मुग्धा भट-सामंत उपस्थित होत्या. सांस्कृतिक आघाडी सिंधुदुर्गचे संयोजक बाळ पुराणीक, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके यांनी सिंधुदुर्गातील सांस्कृतिक वाटचालीची माहिती दिली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोककला असलेली दशावतार, व ही कला जीवंत ठेवलेली दशावतार मंडळे यांना राज्य सरकारकडून भरीव मदत मिळाली पाहिजे अशी आग्रही मागणी केली . तसेच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाचे एक केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात होण्यासाठी भाजपा सांस्कृतीक आघाडीने पुढाकार घ्यावा अशी मागणी केली.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ल्यात-१२-नोव्हे/
यावेळी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ मुणगंट्टीवार यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोककलेला राजाश्रय मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अक्षया चितळे यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटोओळी – वेंगुर्ला भाजपाच्या कार्यालयात कोकण विभागाच्या सांस्कृतिक आघाडीच्या संयोजिका अक्षया चितळे यांचे स्वागत करण्यात आले.

