वेंगुर्ला प्रतिनिधी- माजी विद्यार्थी संघ-न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा, अभिनव फाऊंडेशन -सावंतवाडी आणि किरात ट्रस्ट, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण वर्गाकरिता निवड चाचणी लेखी परीक्षा ८ नोव्हेंबर रोजी बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात संपन्न झाली. या परीक्षेकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ३६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या उदघाट्नप्रसंगी खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा. आनंद बांदेकर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अजित केरकर, किरात ट्रस्टच्या सीमा मराठे, अभिनव फाऊंडेशनचे ओंकार तुळसुलकर, क्रीडा प्रशिक्षक जयराम वायंगणकर, जयवंत चूडनाईक आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाचे काम शशांक मराठे, ओंकार तुळसूलकर आणि समीर घोंगे यांनी पहिले. याकामी खर्डेकर महाविद्यालयाचे कर्मचारी वृंद यांचे विशेष सहकार्य लाभले. या परीक्षेच्या माध्यमातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील तीन महिने प्रशिक्षण दिले जाईल अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
फोटोओळी – पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण वर्गाकरिता निवड चाचणी लेखी परीक्षेला जिल्ह्यातून विद्यार्थी सहभागी झाले होते.
Samiksha