कर्त्तव्य दक्ष सिंधुदुर्ग पोलीसांनी विनापास प्रवास करणाऱ्या क्रिकेटर पृथ्वीला आंबोलीत एक तास रोखलभारताचा युवा क्रिकेटर पृथ्वी शॉ हा मित्रासोबत ममुंबईहूनड कोल्हापूरमार्गे गोव्याकडे जाण्यास निघाला होता. त्याची कार बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास आंबोली पोलीस दुरक्षेत्राजवळ आली असता आरोग्य विभागाने त्यांची आरोग्य तपासणी केली.
त्यानंतर पोलिसांनी पासबाबत विचारले, तेव्हा तो थोडा गडबडला. त्याने पास नसल्याचे सांगितले. पास शिवाय जाता येणार नाही असे सांगत पोलिसांनी त्याला तिथेच रोखले. त्याने पोलिसांना विनंतीही केली. पण पोलीस आपल्या कर्तव्यापासून जराही विचलित झाले नाहीत. पोलीस आपणास सोडणार नाही हे ओळखून पृथ्वीने तिथूनच ऑनलाईन पाससाठी अर्ज केला. त्यानंतर एक तासाने त्याचा पास तयार होऊन त्याच्या मोबाईलवर आला. तो पास पोलिसांना दाखवून पुढे गोव्याकडे मार्गस्थ झाला.