मुंबई- आज गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी डॉ. सुरेखा पाटील, अध्यक्षा, सुहित जीवन ट्रस्ट, पेण यांना महासंस्कृती व्हेंचर्स आयोजित महासंस्कृती कोकण सन्मान 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेhttps://sindhudurgsamachar.in/maharashtra-news10-व्या-यशवंतराव-चव्हाण/
हा पुरस्कार मा. श्री. दीपकजी केसरकर, मंत्री, शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉईंट, मुंबई येथे आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आला. या शुभ प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यांनी देखील शुभेच्छा देऊन कौतुक केले तसेच डॉ. पाटील यांना आपले विचार मांडण्यास सांगितले

