दशावतारी नाट्य मंडळांचे जत्रोत्सवांतील वेळापत्रक बदलले
कणकवली I भाई चव्हाण
कणकवली:-दि. ११– छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या आणि मालवणसह अन्य ७ गावांची ग्रामदेवता असलेल्या नांदरुखची ग्रामदेवता श्री देव गिरोबाचा यंदाचा वार्षिक जत्रोत्सव अभुतपुर्व गर्दीत संपन्न झाला. या आठही गावांतील भक्तजणांनी देव गिरोबाच्या दर्शनासह ग्रामदेवी लक्ष्मीची ओटी भरण्यासाठी माहेरवाशींणीसह भक्त्यांनी अलोट गर्दी केल्याने धार्मिक कार्यक्रमास सुमारे एक तास उशिराने सुरुवात झाली.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-news-म-रा-मुक्त-विद्यालय-मंड/
दरम्यान यंदा त्रिपुरारी पोर्णिमा दुपक आली. कोकणातील जत्रोत्सवांमध्ये विशिष्ट तिथीला श्रीकृष्णाच्या हातून दहीहंडी फोडून दहिकाल्याचा समारोप करण्याची परंपरा आहे. त्यामुळे काही दशावतारी नाट्य मंडळांच्या वार्षिकानुसार एकाच दिवशी दोन-तीन गावांच्या जत्रा आल्याने दशावतारी नाटके सादर करण्यासाठी खूपच दमछाक झाली. यंदा तृतीयेला दहिहंडी फोडली जाणारे जत्रोत्सव वादढल्याने नाट्य मंडळांना पर्यायी व्यवस्था करावी लागली. नांदरुखच्या जत्रोत्सवाचे परंपरेनुसार वार्षिक वालावलकर दशावतारी नाट्य मंडळाकडे असते. पण या तृतीयेच्या दहिकाल्या एकाच दिवशी त्यांच्याकडे तीन गावांची वार्षिके आलीत. त्यामुळे नांदरुखच्या यंदाच्या जत्रोत्सवात त्यांनी प्रथमच चेंदवणकर दशावतारी नाट्य मंडळाकडे या जत्रोत्सवाच्या नाटकाची जबाबदारी सोपवावी लागली. त्यामुळे नांदरुखवासिंयांना प्रथमच अन्य दशावतारी नाट्य मंडळांच्या नाटकाचा आनंद लुटता आला.
यंदाच्या वर्षी मुळ श्रावण येथील, पण मुंबईत डेकोरेशनच्या व्यवसायात असलेले निलेश जयवंत बागवे यांनी दरवर्षीप्रमाणे गिरोबा ट्रव्हलचे चव्हाण बंधु यांच्या सहकार्याने माडांच्या हिरव्या पात्यांपासून गाभार्यात आकर्षक सजावट केली. त्यामुळे प्रथमच माडांच्या झावळांच्या हिरव्या पाण्यापासून आकर्षक सजावट पाहण्याचा योग भाविकांना लाभला.
यंदा गिरोबाच्या पालखीचे म़दिरामध्ये ढोल ताशांच्या गजरात आणि आकर्षक नयनरम्य गगनभेदी फटाक्यांच्या आतषबाजीत लवकर आगमन झाले. मात्र दर्शनासाठी मालवण शहरासह वायरी, कुंभारमाठ, घुमडे, आनंदव्हाळ, कर्लाचाव्हाळ, कातवड या नांदरखच्या मुळ वाड्यांतील भक्तांनी अलोट गर्दी केली. त्यामुळे यंदा प्रथमच दर्शनासाठी दोन रांगा लावाव्या लागल्यात. त्यामुळे जत्रोत्सवातील अन्य धार्मिक विधी सुरू करण्यास तासभर अधिक वेळ झाला. दशावतारी नाटक रात्रो उशीरा सुरू झाले. तरीही नाटकाचा आस्वाद घेण्यासाठी नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभात समयी श्रीकृष्णाच्या रुपात तृतिय तिथीला दहीहंडी फोडून दहिकाल्याची सांगता झाली.

