प्रतिनिधी-अभिमन्यू वेंगुर्लेकर
सावंतवाडी– नुकताच दि.4 नोव्हेंबर 2022 रोजी ‘प्रेम प्रथा धुमशान’ हा चित्रपट महाराष्ट्रात रिलीज झाला. महाराष्ट्रातील सातारा,कोल्हापूर, नाशिक, मुंबई, नागपूर,पुणे,कराड इचलकरंजी ,ठाणे,सिंधुदुर्ग, इतर ठिकाणी देखील हा चित्रपट रिलीज झाला.परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मधील कोलगाव इथल्या मल्टिप्लेक्स आर्या नोव्हा थिएटर मध्ये मालवणी चित्रपटाची ॲलर्जी असल्याचे समजते. सिंधुदुर्गातील कणकवलीमध्ये या चित्रपटाचा शो हाऊसफुल्ल चालतो आहे . https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-दुर्बिणीद्वारे-विद्या/
सावंतवाडी मधील कोलगाव इथल्या मल्टिप्लेक्स आर्या नोव्हा थिएटर मध्ये चित्रपटाचा शो दुपारी12.35 असताना आणि 15 ते 25 माणसे चित्रपट पाहण्यास आलेली असूनही चित्रपटाची तिकिटे दिली जात नाहीत याचा अर्थ काय समजायचा ? गुरुवार दि.10 तारखेचा दुपारचा 12.35 चा शो रद्द करण्यात आला. असेच आदल्या दिवशीचा सुध्दा शो रद्द करण्यात आला होता. या थिएटरमध्ये आठवडय़ातून चार दिवस चित्रपट दाखवला जात नाही. पण हिंदी चित्रपट मात्र चार लोकांसाठी सुध्दा दाखविण्यात येतो. मालवणी चित्रपटांना प्रोत्साहन देण्याऐवजी भाषेचे खच्चीकरण करुन इतर भाषांतील चित्रपटांना प्रोत्साहन द्यायचे हा नियम कुठला? खरे पाहता हे थिएटर आडबाजूला आहे. या थिएटरमध्ये चित्रपट पाहायला जाणे हेसुद्धा खर्चिक आहे. नागरिकांना थिएटरपर्यंत जाऊनही चित्रपट न पहाता तसेच परतावे लागत आहे.त्यामुळे सामान्य नागरिकांच्या पदरी मानसिक, शारीरिक, आथिर्क नुकसान आणि निराशा पडत आहे. त्याशिवाय मालवणी भाषा आणि सिंधुदुर्गातील मालवणी कलाकार असलेल्या या चित्रपटाला प्रोत्साहन न देता या चित्रपटाचा शोचं थिएटर मालक बंद ठेवण्याच्या मनमानी कारभारामुळे नागरिकात नाराजीचा स्वर उमटत आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-news-अजून-एक-प्रकल्प-महाराष/
या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक अभिजित मोहन वारंग यांनीही खंत व्यक्त करीत नाराजी व्यक्त केली.आपली नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले,’ यापुढील सिंधुदुर्गातील शूटिंग साठी विचार करावा लागेल.’ या चित्रपटाचे निर्माते सत्या अय्यर, सह निर्माते स्वरा वारंग , रचना विज, मोहीत छाब्रा, नमण तलवार आहेत. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 140 कलाकार प्रेम प्रथा धुमशान चित्रपटात आहेत.आपलेच लोक आपल्याच मालवणी लोकांना प्रोत्साहन देत नाहीत. यामुळे मालवणी नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.प्रेम प्रथा धुमशान या चित्रपटात शिवाली परब, विनायक चव्हाण,अभय खडपकर,मिलिंद गुरव, विश्वजीत पालव आणि इतर सहकलाकार आहेत.

