Maharashtra news: जागतिक मधुमेह दिनानिमित्ताने मिरवणूक आणि आरोग्य तपासणी

0
24

मुंबई I अनुज केसरकर

मुंबई : जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने लायन्स क्लब ऑफ मिडडाऊनच्या वतीने काळाचौकी येथील अभ्युदय नगर परिसरात भव्य मिरवणूक तसेच जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली होती. माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला होता. यात खासदार अरविंद सावंत, उद्योजिका अरुणा ओस्वाल, लायन्सचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संजय चुरी, संतोष शेट्टी, विराफ मिस्त्री, सरस्वती शंकर, प्रसाद पानवलकर, रवींद्र कडेल, डॉ. भरत परमार, बुराणी दोहाडवाला आदी मान्यवर सहभागी झाले होते.

मिरवणूक डॉ. हेगडे स्पेशालिटी डेंटल क्लिनिकt येथून सुरू होऊन काळाचौकी परिसरातील शिवाजी विद्यालय या भागात तिची सांगता केली गेली. शिवाजी विद्यालय येथे सांगता झाल्यानंतर तिथे वैद्यकीय चिकित्सा सुरु करण्यात आली. यावेळी मोफत वैद्यकीय तपासणी, रक्त, शर्करा व नेत्र तपासणी, इसीजी आदींच्या चाचण्या घेण्यात आल्या. यावेळी एका कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. त्यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन करताना आपले विचार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here