महानगर टेलिफोन निगमची देखील ८.८३ लाखांची वसूली
मुंबई I अनुज केसरकर
मुंबई : राष्ट्रीय लोकअदालत या उपक्रमाला लघुवाद न्यायालय, मुंबई येथे उत्तम प्रतिसाद मिळाला असून मुख्यालय व वांद्रे शाखा मिळून ७८ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. तसेच मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत लघुवाद न्यायालयातील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या महानगर टेलिफोन निगम लि. यांची २४५ प्रकरणे निकाली निघाली असून त्यांना एकूण ८,८३,९४२ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यातील न्यायप्रक्रियेला या उपक्रमामुळे गती आल्याचे दिसून येत आहे.
संबंधित ४ थे राष्ट्रीय लोकअदालतीला लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीकांत आणेकर तसेच अतिरिक्त मुख्य न्यायाधीश एम. एन. सलीम, एस. एस. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतीचे कामकाज यशस्वीरित्या पार पडले. राष्ट्रीय लोकअदालतीला लघुवाद न्यायालयाचे न्यायिक अधिकारी श्रीमती आर. एस. भोसले, श्रीमती एस. यु. देशमुख, ए. बी. होडावडेकर, श्रीमती जे. एस. जगदाळे, श्रीमती एम. डी. कांबळे, डी. एस. दाभाडे, एस. डी. चव्हाण तसेच वकील डी. पी. चाचा, उज्वला घोडेस्वार, अनिता पुरबे, पंकज ठाकर व सामाजिक कायकर्ते-पत्रकार अशोक रा. शिंदे यांनी कामकाज पाहिले. या लोकअदालतीचे यशस्वी नियोजन प्रबंधक ना. वा. सावंत तसेच अप्पर प्रबंधक निलम शाहीर, मीना शृंगारे यांनी केले. कामकाजामध्ये कर्मचारी वर्गाचाही सक्रीय सहभाग राहिला. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-news-जागतिक-मधुमेह-दिनानिमि/