Sindhudurg News: शिवसेना अल्पसंख्यांक सेल तालुकाप्रमुखपदी रफिक बेग

1
215

वेंगुर्ला प्रतिनिधी- पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, जिल्हासंफ प्रमुख अरुणभाई दूधवडकर यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार वेंगुर्ला तालुक्यातील रेडी गावातील कट्टर शिवसैनिक याकूब उर्फ रफिक बेग यांची अल्पसंख्यांक वेंगुर्ल तालुका प्रमुखपदी निवड झाली आहे.

शिवसेना अल्पसंख्यांक सेलचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अब्दुल मज्जीद अब्बास बटवाले यांच्या सहीचे पत्र नुकतेच वेंगुर्ला येथे शिवसेनेची मासिक सभेचे औचित्य साधून वितरित करण्यात आले. यावेळी सावंतवाडी मतदार संघ प्रमुख शैलेश परब, उपजिल्हा प्रमुख अजित सावंत, तालुका प्रमुख बाळू परब, महिला तालुकाप्रमुख सुकन्या नरसुले, संदेश निकम, युवासेना तालुका प्रमुख पंकज शिरसाट, रेडी उपसरपंच नामदेव राणे, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत राऊळ, विभाग प्रमुख काशिनाथ नार्वेकर, रश्मी डिचोलकर, विनोद राणे, प्रसाद रेडकर तसेच तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.

फोटोओळी – शिवसेना अल्पसंख्यांक सेल तालुकाप्रमुखपदी रफिक बेग यांना त्यांच्या निवडीचे पत्र देण्यात आले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here