देवगड:
कृषी तंत्र निकेतन वळीवंडे ता. देवगड येथे कुक्कुटपालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या संस्थेमध्ये शासकीय अनुदान सहित विविध स्तरावरील नागरिकांना कुक्कुटपालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा जास्तीतजास्त महिलांना / पुरुषांना व बचतगटांना लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण रविवार दि. 20/11/2022 रोजी आयोजित करण्यात आले आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-कृषी-स्वावलंबन-योजनेसा/
प्रोजेक्ट व प्रात्यक्षिकसह कुक्कुटपालन विषयी संपूर्ण माहिती https://sindhudurgsamachar.in/माझी-कथा-नैतिक-मूल्यांच/
व्यवसाय प्रमाणपत्र हवे असल्यास 2 फोटो व आधारकार्ड आणणे . प्रवेश शुल्क – 600 रु चहा,नाश्ता, जेवण,व वाचन,लेखन साहित्य ,सहभाग प्रमाणपत्र.
( *अटी आणि शर्ती लागू )
प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये :
१) बंदिस्त अर्धबंदिस्त व मुक्त कुक्कुटपालन पद्धती.
२) ऋतू बदलातील परिणाम व निवारण.
३) कुक्कुटपालन संदर्भात विविध शासकीय योजना आणि त्यासाठी लागणारे अधिकृत प्रमाणपत्र व प्रशिक्षण देण्यात येईल.
४) परसातील कुक्कुटपालन.
५) कुक्कुटपालनासाठी लागणारी शेड उपकरणे भांडी औषधे आणि रोगनिदान.
६ ) खाद्य पाणी व्यवस्थापन.
७ ) कोंबड्याचे अंतरंग विच्छेदन ( कोंबडी कटाई )
नोंदणी संपर्क – सुधाकर सावंत – 7039169662, निलेश वळंजू- 9604410063

