दोडामार्ग / सुमित दळवी
सिंधुदुर्ग: महाराष्ट्र शासन कृषि विभाग मार्फत महाडीबीटी या संगणकीय आज्ञावलीवर शेतकऱ्यांसाठी विविध घटकांसाठी अनुदान दिले जाते. शेती उपयुक्त अवजारे, ठिबक संच, तुषार संच, शेततळे, शेततळे अस्तरीकरण, आंबा पुनर्जीवन, शेडनेट, मल्चिंग, पॅकहाऊस, पॉलीहाऊस इत्यादी घटकांसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावेत. अर्ज करण्याची सुविधा वर्षभर ३६५ दिवस व २४ तास सुरु आहे. सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती च्या सर्व शेतकरी लाभार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन मा. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग यांचेकडून करण्यात येत आहे.https://sindhudurgsamachar.in/news-फेसबुक-मेटाच्या-भारताच्/
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गाचे कमी लाभार्थी अर्ज करीत असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीचे अनुदान पूर्णपणे खर्च होत नाही, अशी खंत व्यक्त करून मा. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी या राखीव प्रवर्गातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी अर्ज करून शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.


