Maharashtra News: राज्य सरकारचा स्वातंत्र्यसैनिकांचे निवृत्तीवेतन दुप्पटीने वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

0
24

मुबंई- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 15 महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन दुप्पटीने वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. याचा लाभ राज्यातील सहा हजारांहून जास्त स्वातंत्र्य सैनिकांना होणार आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-सिंधुदुर्ग-जिल्ह्याती/

आज दुपारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन दुपटीने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह इतर मंत्रिमंडळ सदस्य देखील उपस्थित होते. या निर्णयामुळं स्वातंत्र्यसैनिकांनी आनंद व्यक्त केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर आता स्वातंत्र्यसैनिकांना 10 हजार रुपयांऐवजी दरमहा 20 हजार रुपये निवृत्ती वेतन मिळेल. भारतीय स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम आणि गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांना याचा लाभ मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here