मुंबई – दृश्यम चित्रपटानंरत दृश्यम २ ची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत होते. दृश्यम २ चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला.चित्रपट रिलीज होताच थिएटरमध्ये विक्रम करताना दिसत आहे. दृष्यम हा या वर्षातील दुसरा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. दृश्यमच्या यशानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
‘दृश्यम 2’ ने पहिल्याच दिवशी सिद्ध केले की 7 वर्षानंतरही लोकांच्या मनातील विजय साळगावकरची क्रेझ कमी झालेली नाही. यावेळी अक्षय खन्ना चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसतोय आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित करण्यात यशस्वी झाला. अभिषेक पाठक दिग्दर्शित सस्पेन्स-क्राइम ड्रामा पुन्हा एकदा लोकांना आकर्षित करण्यात यशस्वी झाला आहे. या चित्रपटात जुनी स्टारकास्ट तब्बू, श्रिया सरन, इशिता दत्ता, अजय देवगन हे आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले आहे. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘दृश्यम 2’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. 18 नोव्हेंबर 2022 रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने बंपर ओपनिंग केली. या चित्रपटाला समीक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 14 कोटींची ओपनिंग केली होती. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, दृश्यम 2 ने शनिवारी 21.20 कोटी रुपये जमा केले आहेत. या चित्रपटाची एकूण कमाई 37 कोटींवर गेली आहे.

