वेंगुर्ला प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण शाखा-वेंगुर्ला, जिल्हा व्यापारी महासंघ, वेंगुर्ला तालुका व्यापारी व व्यावसायिक संघ वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी, औद्योगिक, व्यावसायिक व घरगुती वीज ग्राहक मेळाव्यात संतप्त वीज ग्राहकांनी समस्यांचा पाढा वाचत वीज वितरणच्या अधिका-यांना धारेवर धरले.
साई मंगल कार्यालयात जिल्हा व्यापारी संघाचे उपाध्यक्ष संजय भोगटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या वीज ग्राहक मेळाव्यास जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, वेंगुर्ला तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर, सचिव राजन गावडे, ग्राहक मंच वेंगुर्ल्याचे अध्यक्ष डॉ.संजिव लिगवत, महावितरणचे कार्यकारी अभियंता विनोद विपर, कार्यकारी अभियंता लोकरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिशाळ, उप विभागीय अभियंता खटावकर, सामाजिक कार्यकर्ते नंदन वेंगुर्लेकर यांच्यासह कर्मचारी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-news-शिवसृष्टी-प्रकल्पाचा/
मेळाव्यात सहभागी झालेल्यांपैकी सुमारे ५५ ग्राहकांनी विविध तक्रारी मांडल्या. मेळाव्यात आलेल्या प्रत्येक तक्रारीचे येत्या १५ दिवसांत निराकरण केले जाईल, अशी ग्वाही कार्यकारी अभियंता विपर यांनी दिली.
फोटोओळी – वेंगुर्ला येथील शेतकरी, औद्योगिक, व्यावसायिक व घरगुती वीज ग्राहक मेळाव्यात उपस्थित ग्राहकांनी समस्या मांडल्या.
[…] […]