Job: लोकमान्य टिळक महानगरपािलका सर्वसाधारण रुग्णालय शीव, येथे ११८ प्रशिक्षित परिचारीका(कंत्राटी तत्वावर ) यांची सहा महिन्यांकरिता भरती

0
109

मुंबई – 22. लोकमान्य टिळक महानगरपािलका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय शीव, येथे अधिपरिचारिक यांची सहा महिन्यांकरिता कंत्राटी पद्धतीने करारनामा सेवा नेमणूक करण्यासाठी साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचे शुल्क रुपये 354/- रोखीत रोखपाल विभाग, कॉलेज बिल्डिंग , तळमजला, रूम नं 15, शीव, मुंबई – 400 022 येथे भरण्यात यावे. परिपूर्ण भरलेले अर्ज, आवश्यक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित , छायांकित प्रतींसह व अर्जाचे शुल्क भरलेल्यापावतीसह शनिवार व रविवार सोडून कार्यालयीन वेळेत सकाळी 11.00 तेदुपारी 3.00 वाजेपर्यंत परिचारिका आस्थापना कक्षात दि.23.11.2022 ते िद 02.12.2022 पर्यंत स्विकारले जातील.दि. 02.12.2022 रोजी संध्याकाळी 5.00 या वेळे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत व त्याबाबतीतील कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार स्विकाकारला जाणार नाही.

कंत्राटी पदांचा तपशील

१. प्रशिक्षित परिचारीका(कंत्राटी तत्वावर ) सहा महिन्याकरीता
एकूण ११८ पदे
महिना वेतन – ३०,००० /-
शैक्षणिक अर्हता :- उमेदवार बारावी पास व कमीत कमी परिचारीका पदासाठी आवश्यक असलेली जीएनएम ही पदवी धारण केलेली असावी. तरी उच्चतम गुणवत्ताधारक उमेदवार अर्ज काऊ शकतात परंतु वेतन 30,000/- च राहील.

उमेदवार मान्यताप्राप्त नर्सिंग कौंसिलचा नोदं णीकृत असावा,किंवा त्याने Nursing Council चे Registration 3 महिन्यात मिळवावे .
वयोमर्यादा: या प्रवर्गासाठी उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी व 38 वर्षांपेक्षा अधिक असता कामा नये. अर्जासोबत जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला सादर करावा.

मागासवर्गीय प्रवर्गासाठी उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी व 43 वर्षांपेक्षा अधिक असता कामा नये. अर्जासोबत जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला सादर करावा.

सर्वसाधारण अटी :-

  1. उमेदवारांनी विवाह नोदंणी प्रमाणपत्र ,नावात बदल झाल्याचे राजपत्र सादर करावे. तसेच ते नसल्यास विवाहित महिला उमेदवार विवाहापूर्वीच्या नावाने अर्ज करू शकतात.
  2. उमेदवाराने अर्जावर स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक व ई मेल आयडी नमूद करणे आवश्यक आहे.
  3. उमेदवाराला कोणत्याही न्यायालयालयाने नैतिक अध:पतन किंवा वा फौजदारी स्वरूपाच्या खटल्यात खटल्यात शिक्षा दिली असल्यास, तसेच उमेदवाराची पोलीस चौकशी /न्यायालयीन प्रकरण विलंबित असल्यास /शिक्षा झालेली असल्यास उमेदवाराने त्याबाबत माहित देणे आवश्यक आहे

4.निवडप्रक्रिया सुरु झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर उमेदवाराने चुकीची माहिती ,प्रमाणपत्र सादर केल्यास किंवा कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्याची उमेदवारी रद्दबादल करण्यात येईल.तसेच नियुक्ती झालेली असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्याची नियुक्ती समाप्त काण्यात येईल.

  1. प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव निवड किंवा या कोणत्याही वेळेस कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचे अधिकार महापािलका आयुक्त बृहन्मुंबई महानगरपािलका यांना आहेत.
  2. उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.
    7.निवड झालेल्या उमेदवारांस रुपये 100/-विधी आकाराप्रमाणे (वेतन मिळकतीनुसार) बॉण्ड पेपरवर विहित नमुन्यात कंत्राट करार करणे आवश्यक असून सदर खर्च संबंधित उमेदवारास करावा लागेल.
  3. सदर कंत्राटी तत्त्वावरील पदधारकांची नियुक्ती कोणत्याही वेळी पूर्व सूचना न देता कमी करण्याचे अधिकार बृहन्मुंबई महानगरपािलका आयुक्तांना आहेत.
  4. सदर कंत्राटी तत्त्वावरील पदधारकाची नियुक्ती कालावधीमध्ये उमेदवारानेशिस्तभंग केल्याचे निदेर्शनास आल्यास त्यांची नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येईल.
  5. कुठल्याही कारणास्तव निवड झालेल्या उमेदवारास पदाचा राजीनामा द्यावयाचा असल्यास ८ दिवसांची पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे.
  6. नियुक्ती झालेल्या उमेदवारास म.न.पा. मध्ये कायम स्वरूपी सेवेसाठी कोणताही हक्क सांगता येणार नाही.तसेच त्यांना नियमित सेवेचे कोणतेही फायदे अनुज्ञेय असणार नाहीत.
  7. लोकमान्य टिळक महानगरपािलका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय शीव, मुंबई –22.येथे रुग्णालयात कोणत्याही विभागात तीन पाळीत काम करावे लागेल.
  8. निवड झालेल्या उमेदवारांना २९ दिवसानंतर एक दिवसाचा सेवाखड देण्यात येईल.

विशेष सुचना :

  1. यापूर्वी संबंधित कार्यालयात व अन्य ठिकाणी सादर केलेले/ प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
    तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोणत्याही व्यक्तीला व इतर दुस-या संस्थेला अर्ज विकणे ,स्वीकारणे, इत्यादींचा अधिकार कोणालाही दिलेला नाही याची कृपया नोंद घ्यावी.
  2. अर्जाचे विहित मूल्य भरून त्याची पावती जोडल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
  3. टपालाने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  4. मुलाखतीच्यावेळी आधार कार्ड, पॅन कार्ड , बँके चे Cancelled Cheque, पासबुकाची छायांकीत प्रत,आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या मूळ प्रतींसह साक्षांकित छायांकित प्रतींसह उपस्थित राहावे व साक्षांकित प्रतीं अर्जासोबत जोडाव्या.
  5. उमेदवारास पूर्वानुभव असल्यास त्याच्या प्रमाणपत्रांच्या मूळ प्रतिसह साक्षांकित छायांकित प्रतीसह मुलाखतीस उपİ̾थत राहावे.
  6. मुलाखतीचे ̾स्थळ : अधिष्ठाता कार्यालय, लोकमान्य टिळक रुग्णालय, शीव, मुंबई -22.
  7. मुलाखती िद. 13.12.2022 व 14.12.2022 रोजी सकाळी 11 वा. ते दु.3 वाजेपयōत घेतल्या जातील.
  8. अर्जाचे शुल्क – रु 291 + 18% GST.

इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक अर्हतेच्या छायांकित प्रती व अलीकडेच काढलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र चिकटवून विहित नमुन्यातील सर्व बाबींची पूर्तता केलेले अर्ज लोटीमस रुग्णालयाच्या परिचारीका आस्थापना कक्षात शनिवार व रविवार सोडून कार्यालयीन वेळेत सकाळी 1.00 तेदुपारी 3.00 वाजेपर्यंत स्विकारले जातील.दि.02.12.2022 रोजी सकाळी 11 ते 5.00 या वेळेनंतआलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत व त्याबाबतीतील कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.

(टीप :- कंत्राटी भरती प्रक्रियेबाबतचे अंतिम निर्णय व सदरबाबत बदल करण्याचे अधिकार प्रशासनाकडे राहतील. तसेच उपरोक्त पदाकरीता नियुक्ती होणा-या उमेदवारांना महानगरपिलकेची सेवानियमावली व इतर कुठल्याही प्रकारचे फायदे लागू होणार नाहीत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here