वेंगुर्ला प्रतिनिधी- मुंबई विद्यापिठ क्रिडा सकुल मरिन लाईन येथे १४ ते १६ नोव्हेंबर रोजी झालेल्या झोन-४च्या स्पर्धेत ५ किलोमिटर चालणे या प्रकारात तन्वी दिनकर दळवी हिने ब्राँझ पदक तर उंचउडी प्रकारात प्रतिक प्रसाद डिचोलकर याने ब्राँझ पदक पटकाविले. दोन्ही स्पर्धक खर्डेकर महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जयकुमार देसाई, चेअरमन डॉ.मंजिरी मोरे-देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, प्रभारी प्राचार्य डॉ.आनंद बांदेकर, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, क्रिडा संचालक प्रा.जे.वाय.नाईक, प्रा.देविदास आरोलकर, प्रा.चुकेवाड, प्रा.डॉ.एम.बी.चौगुले, प्रा.नंदगिरीकर, प्रा.वामन गावडे, प्रा.कमलेश कांबळे, प्रा. विवेक चव्हाण, प्रा.डॉ.मुजुमदार यांच्यासह अन्य प्राध्यापकांनी अभिनंदन केले आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-वेंगुर्ल्यात-शिवसेना-ठ/
फोटोओळी – खर्डेकर महाविद्यालयातर्फे तन्वी दळवी व प्रतिक डिचोलकर यांचे अभिनंदन केले.

