Sindhudurg News: संघटन मजबुत करणे साठी जिल्हातील सर्व तालुक्यात एका दिवसात किमान दहा कॉर्नर सभा घेणेचा रत्नागिरी जिल्हा काॅंग्रेसचा मनसुबा

0
15

प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हात काँग्रेसचे जेष्ठ नेते मा. खासदार राहुलजी गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा तीचा हेतू आणि काँग्रेसचे संघटन मजबुत करणे साठी जिल्हातील सर्व तालुक्यात जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व प्रत्येक तालुक्यात एका दिवसात किमान दहा कॉर्नर सभा घेणेचे आदेश मा नाना ( भाऊ ) पटोले, अध्यक्ष प्रदेश काँग्रेस महाराष्ट्र यांनी मार्गदर्शनात दिले आहेत. त्याप्रमाणे सदर कॉर्नर सभा रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेस , सामाजीक न्याय विभाग , ओबीसी विभाग , महिला विभाग , युवक काँग्रेस , एन एस यु आय , सेवा दल ,अल्पसंख्याक विभाग , अनुसुचीत जाती , जमाती विभाग, ऊद्योग विभाग , स्वयंम रोजगार विभाग यांचे वतीने घेण्यात येणार आहे .रत्नागिरी जिल्हातील सर्व काँग्रेस कार्यकर्ता बंधु , भगिनींना आवहन करण्यात आले आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-मच्छीविक्रेते-लवू-ओटवक/

सदर कार्यक्रमात त्या त्या तालुक्यातील जिल्हा पदाधिकारी , तालुका अध्यक्ष , तालुका पदाधिकारी , शहर अध्यक्ष ,सर्व विभाग , सेलचे पदाधिकारी यांनी ऊपस्थित राहण्याचे आहे . कॉर्नर सभे मध्ये बोलण्यासाठी ( प्रत्येकी सात ते आठ मिनीटे ) काँग्रेसचे प्रभावी वक्ते खालील विषयांवर बोलण्या साठी गरजेचे आहेत . ज्या कार्यकर्तांना आपले काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आणि वकृत्व जनते पर्यंत पोहचवायचे आहे आणि काँग्रेस पक्षाचे संघटन बळकट , मजबूत करण्याची ज्यांची इच्छा आहे अशां बंधु – भगिनिनी आपली नावे 9423293494 या व्हाट्स अँप नंबरला कळवावीत .https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-हडी-येथील-कट्टर-राणे-सम/
वक्त्यांसाठी विषय
1 )नफरत छोडो भारत जोडो
2 ) संविधान वाचवणे लोकशाहीची गरज
3 ) बेरोजगारी , महागाई
4 ) मोदी सरकारची देश विघातक धोरणे ( जातीयवाद, धर्मवाद ) आणि त्याचे परिणाम
5 ) गोरगरिब , महिला यांचे वर होणारे अन्याय
6 ) देश वाचविण्यासाठी काँग्रेसची गरज
7 ) शेतकरी -कष्टकरी यांचे प्रश्न , प्रकल्प ग्रस्थांचे प्रलंबित प्रश्न
8 )काँग्रेस मध्ये सामील होणे साठी जनतेला आवहान
वरील आठ विषयांवर प्रभावीपणे सात ते आठ मिनिटात बोलणारे काँग्रेसचे कार्यकर्त बंधु -भगिनि यांनी आपण कोणत्या विषयावर व कोणत्या तालुक्यात बोलण्यास इच्छूक आहोत ते कृपया पाच दिवसात कळवावे असे आवहन अशोकराव जाधव,अध्यक्ष सामाजीक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांनी केले आहे.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here