वेंगुर्ला प्रतिनिधी- स्वच्छतेच्या दुस-या टप्यात राज्यस्तरावर शहर सौंदर्यीकरण स्पर्धा आहे. त्याअंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेच्या मुख्य रस्त्याच्या ठिकाणी आकर्षक अशा स्वरूपाचे कोकणची संस्कृती व वेंगुर्ल्यातील पर्यटन स्थळे दर्शविणा-या प्रतिकृती व वॉलपेटींग तसेच मुख्य चौक सुशोभिकरण करणे अशा काही गोष्टी करण्यात येणार आहेत. दिवाळीत खास आकर्षण म्हणून बनविल्या जाणा-या किल्ल्यांची प्रतिकृती तसेच स्थानिक पातळीवर विशेष लक्ष पडेल अशा प्रतिकृती ज्या ज्या भागातील नागरीकांतून साकारल्या जातील, त्यांना विशेष प्राधान्य देण्यात येतील. वेंगुर्ला नगरपरिषद ही स्वच्छतेचा वसा कायम ठेवून सौंदर्यीकरणात सुध्दा राज्यात नावलौकीक करेल, अशा विश्वास वेंगुलें नगरपरीषदेचे नुतन मुख्याधिकारी पारीतोष कंकाळ यानी नगरपरीषदेच्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.https://sindhudurgsamachar.in/जुन्या-घराच्या-खरेदीनंतर/
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळात कचरा संकलन केंद्रामधील व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाला होता. त्यामुळे दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले होते. गेल्या १५ दिवसांपूर्वी नुतन मुख्याधिकारी श्री. कंकाळ हे पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी सर्व प्रथम कंपोस्टबाग म्हणजे स्वच्छ पर्यटन स्थळाकडे लक्ष केंद्रीत केले. या कचरा संकलन केंद्रातील ब-याचशा मशिनरी बंदावस्थेत आढळल्या. बायोगॅस प्रकल्प, बायो कंपोस्टाग मशिन, लॅस्टिक बेलिग मशिन, एस.टी.पी.लँट, लॅस्टिक क्रशर मशिन या बंद अवस्थेत असल्याने या कच-या संकलन केंद्रात कच-याचा ढिग जमा झाला होता. त्या कच-याची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम मशिनरी चालू करणे हे गरजेचे होते. त्यादृष्टीने काम करत सर्व मशिनरी चालू करण्यात आल्या असून उर्वरीत एक-दोन मशिनरी आवश्यकतेनुसार सुरू करण्यात येणार असल्याची माहिती श्री.कंकाळ यानी दिली.
कचरा संकलन केंद्रातील बिघडलेले व्यवस्थापन पूर्व पदावर आणण्याच्या दृष्टीने कर्मचारी व स्वच्छता विभागाचे कर्मचारी याची बैठक घेण्यात आली. त्याप्रमाणे केलेल्या नियोजनानुसार वेंगुर्ला नगरपरिषेदच्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळ पुन्हा एकदा पर्यटन स्थळाप्रमाणे स्वच्छ व कोणताही दुर्गंध न येणारे तसेच या ठिकाणी नारळ, केळी, पेरू या फळ पिकांसह अन्य उत्पन्न देणारे, शेतक-यांसाठी सेंद्रीय खत उपलब्द करून देणारे एक महत्वपूर्ण स्थळ बनले आहे याची माहिती आज शुक्रवारी मुख्याधिकारी श्री. कंकाळ यांनी पत्रकार परीषदेत दिली.
देश व राज्य स्तरीय स्वच्छता स्पर्धेत अव्वल ठरलेल्या व विविध स्वरूपाची बक्षिसे पटकाविलेल्या वेंगुर्ला नगरपरीषदेच्या तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी कच-याची बाग असलेल्या कचरा संकलन केंद्राला स्वच्छ भारत पर्यटन स्थळ दर्जाचे काम करीत नावलौकीक मिळवून दिला. राज्यातील कानाकोप-यातील नगरपरीषदांकडून, काही स्वयंसेवी संस्था, तसेच शालेय, कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या सहली, वरीष्ठ अधिकारी यानी या स्वच्छ भारत पर्यटन स्थळाला भेटी दिल्या व स्वच्छतेचे नाव राज्यात तसेच देशात पोहोचले होते.
याप्रमाणेच शहरातील कुत्र्याचे निर्बिजीकरणाचे अभियान हे कॅम्प येथील पर्यटन सुविधा प्रकपाच्या ठिकाणी राबविण्यात येणार आहे. सुमारे ८०० कुत्र्याचे निर्बिजीकरण येथे केले जाणार आहे. त्यादृष्टीने नियोजन केलेले आहे. येत्या दोन माहन्यात हे निर्बिजीकरणाचे काम पूर्णत्वास येईल. आणि भटाक्या मोकाटकुत्र्यापासून नागरीकांना सुरक्षितता मिळेल. त्याचप्रमाणे नगरपरिषदेचे बंद दुकान गाळे चालू करण्यासंदर्भात प्रयत्न करणे. सागर रिसॉर्ट, संगित रिसॉर्ट हे येणा-या अडचणी दूर करून पुन्हा चालू होण्यासंदर्भात प्रयत्न चालू आहेत. स्विमिग पुल येथे खराब झालेले शौचालय व बाथरूम सुस्थितीत करणे, नगरपरीषद टॉवर वरील बंद अवस्थेत असलेली घडयाळे सुरू करणे, बंद असलेले एल.ईडी. वॉल डिस्ले सुरू करणे, मच्छिमार्केटमधील कोल्ड स्टोअरेज, सक्शन हॅन, पार्किांग, वॉटर इ.टी.एम. इत्यादी ठेकेदारी पध्दतीने चालू करण्याचा प्रयत्न आहे. कंत्राटी कर्मचा-यांचा थकित वेतानाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
या स्वच्छ भारत पर्यटन स्थळाच्या ठिकाणी कच-याच्या माध्यमातून आलेल्या प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, गाड्यांचे टायर तसेच अन्य टाकावू वस्तुपासून घोडा, हत्ती, रणगाडा यासह लक्षवेधी अशा ब-याच कलाकृती बनविण्यात आल्या आहेत. या पैसे देवून केलेल्या नाहित तर ठेकेदारी पध्दतीत काम करणा-या ऋषिकेश बाबुराव जाधव यांनी आपल्या अंगातील कलागुणाद्वारे साकारल्या आहेत.
प्रशासकिय इमारत, भाजी मार्केट व मच्छिमार्केट या भागात बसविण्यात आलेल्या फायर हायड्रट प्लांटचे टेस्टींग झालेले असून ते आता कोणत्याही क्षणी वापरता येणारे आहे. तसेच कॅम्प येथील फायर स्टेशनमध्ये अग्निशामक गाडीत त्वरीत पाणी भरण्यासाठी लागणारे हायड्रट पॉईंटमागविण्यात आलेले असून नादरूस्त झालेल्या अग्निशामक बाईक दुरूस्त करण्यात येणार आहे.
शहरात बाजारपेठ भागात भाजी मार्केटमध्ये किरकोळ व्यापा-यासाठी प्रति चौरस मीटरच्या लाईन नव्याने मारण्यात आल्या असून प्रत्येक भाजी व तत्सम माल विक्रीसाठी जागा उपलब्द होईल. नगरपरीषद मार्केटच्या भागात रस्त्यावर माल विक्री करणा-यांनी माल विक्रीसाठी नगरपरीषदेच्या जागेतच बसावे असे माल विक्रेत्यांना, तसेच बाजारपेठेत माल खरेदी-विक्रीसाठी आलेल्या ग्राहक व व्यापा-यांनी त्याचप्रमाणे कामानिमीत्त बाजारपेठ भागात आलेल्या नागरीकांनी आपली वाहने नगरपरीषदेच्या वाहनतळाच्या ठिकाणी पार्किग करून सहकार्य करावे असे आवाहन तसेच मुख्याधिकारी श्री. कंकाळ यांनी आवाहन केले आहे.