वेंगुर्ला प्रतिनिधी- भाजपाच्या डोंबिवली ग्रामीण महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुहासिनी उर्फ मनिषा राणे यांनी वेंगुर्ल तालुका कार्यालयाला भेट दिली असता महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.http://https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-news-कोकणातले-गेले-पुण्यात-व/
आपण डोंबिवली येथे पालकमंत्री रविद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे. भविष्यात वेंगुर्ला तालुक्याची सून म्हणून विशेष लक्ष घालून महिलांना आत्मनिर्भर बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुहासिनी राणे यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, बाळा सावंत, वृंदा गवंडळकर, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, ईशा मोंडकर, हसिनाबेन मकानदार, वृंदा मोर्डेकर, आकांक्षा परब, श्रद्धा धुरी, दादा केळुसकर, दिपक नाईक, विजय बागकर, हर्षद साळगांवकर, संदिफमार बेहरे, दादा तांडेल, रमेश नार्वेकर आदी उपस्थित होते.
फोटोओळी – भाजपाच्या डोंबिवली ग्रामीण महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुहासिनीराणे यांनी वेंगुर्ल तालुका कार्यालयाला भेट दिली असता प्रार्थना हळदणकर यांनी त्यांचे स्वागत केले.


