मनोरंजन : मराठी चित्रपट निर्माते कॅप्टन कल्पेश मगर यांना पितृशोक.

0
69

नुकताच येऊन गेलेल्या ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या चित्रपटाचे निर्माते कॅप्टन कल्पेश मगर यांचे वडील रविंद्र हरिभाऊ मगर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने मुंबईत निधन झाले आहे. गेली काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर कांदिवली येथील ‘विन्स हॉस्पिटल’मध्ये उपचार सुरु होते. प्रकृतीत सुधारणा जाणवल्याने त्यांना घरी नेण्यात आले होते. मात्र काही दिवसांत पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर २ डिसेंबर रोजी अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. तेथेच त्यांना ‘तीव्र ब्रेन स्ट्रोक’चा झटका आल्याने निधन झाले. उच्च-तंत्रविद्याविभूषित असलेल्या रविंद्र हरिभाऊ मगर यांनी नुकतेच वयाच्या ७० व्या वर्षात पदार्पण केले होते. इंजिनीरिंग क्षेत्रात व्यावसायिक म्हणून त्यांनी भरीव कार्य केले असून अनेक सामाजिक संस्थांना आर्थिक पाठबळ दिले आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, एक मुलगी, जावई, सुना आणि नातवंडे असा समृद्ध परिवार आहे. त्यांचे सुपुत्र कॅप्टन कल्पेश हे मास्टर मरिनर असून त्यांनी नुकताच विजय पाटकर दिग्दर्शित ‘वऱ्हाडी वाजंत्री’ चित्रपट निर्माण केला आहे तर जेष्ठ पुत्र भूषण व्यवसायाने वकील असून बांधकाम आणि वाहतूक व्यवसायात सक्रिय आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here