वेंगुर्ला प्रतिनिधी- सिधुदुर्ग जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा क्रिडा संकुल ओरोस येथे संपन्न झाली. यात उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलच्या रमाकांत विकास बागायतकर याने १७ वर्षाखालील ७१ किलो वजनी गटातत अजिक्यपद पटकाविले. त्याची कोल्हापूर येथे होणा-या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला हर्षद मोर्जे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-news-हेमू-दळवी-सरांना-शिष्य/
वेंगुर्ला तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत प्रेरणा रमाकांत कुबल, योजना रावजी कुर्ले व साईश अनिल भाईडकर यांनीही विशेष प्राविण्य दाखविल्यामुळे त्यांचीही जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, संस्था चेअरमन विरेंद्र कामत-आडरकर, सचिव रमेश नरसुले यांनी अभिनंदन केले आहे.
फोटो – रमाकांत बागायतकर

