वेंगुर्ला प्रतिनिधी- खानोली-सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान या धार्मिक स्थळावर ३० नोव्हेंबरपासून दत्तजयंती उत्सवाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, बुधवारी दत्तजन्म सोहळा हा मुख्य धार्मिक कार्यक्रम होणार आहे.
यानिमित्त बुधवारी सकाळी श्रींची पाद्यपूजा, गुरुचरित्र सप्ताह पठण व दत्तनामस्मरण, दुपारी आरती, तीर्थप्रसाद व नैवेद्य, सायंकाळी ६ वाजता दत्तजन्मसमयी पुष्पवृष्टी, पालखी प्रदक्षिणा, भिक्षादान, आरती, सायंकाळी ७ वाजता बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळ कवठी (दिनेश गोरे) यांचा ‘गौरीपूजन‘ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
या उत्सवासी सांगता गुरुवारी विविध कार्यक्रमांनी होणार आहे. यात दुपारी आरती, तिर्थप्रसाद, पालखी प्रदक्षिणा, महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता आरोलकर दशावतार नाट्यमंडळ आरवली (भाऊ आरोलकर) यांचा ‘विधीलिखित‘ (दत्तदर्शन) हा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान कमिटीचे व्यवस्थापक प.पू.दादा पंडित यांनी केले आहे.
फोटो – श्री दत्त, सुरंगपाणी.


