वेंगुर्ला प्रतिनिधी- डॉ.बाळासाहेब सावंत दापोली कोकण कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूत गटाच्या विद्यार्थ्यांनी जागतिक मृदा दिनानिमित्त तुळस येथे मृदा दिन साजरा केला.
तुळसचे ग्रामदैवत श्री देव जैतीर मंदिराच्या सभामंडपात गावातील शेतक-यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे रक्षण करणे, मातीचे प्रदुषण थांबविणे आणि आपल्या मातीचे संरक्षण कसे करावे याविषयी प्रात्यक्षिकासह उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी पुरुषोत्तम भिसे, हर्षल नानेकर, गणेश कुंटे, उत्कर्ष दानोळे, अभिषेक सरकटे, सिद्धेश काळे, पंकज ओमसे, सिद्धेश दरेकर, अक्षय गोसावी, मेघःशाम सोनावणे उपस्थित होते.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-सुरंगपाणी-येथे-बुधवारी/
फोटोओळी – मृदा दिनानिमित्ताने कृषीदूतांनी तुळस येथे शेतक-यांना मार्गदर्शन केले.

