Sindhudurg News: वेंगुर्ला तालुका सेवानिवृत्त कर्मचारी असोसिऐशन तर्फे १७ डिसेंबरला ‘‘पेन्शनर्स डे‘‘ मेळावा

0
36
वेंगुर्ला तालुका सेवानिवृत्त कर्मचारी असोसिऐशन तर्फे १७ डिसेंबरला ‘‘पेन्शनर्स डे‘‘ मेळावा

वेंगुर्ला प्रतिनिधी- पेन्शनर्स डे हा सेवानिवृत्ती कर्मचा-यांच्या जिवनातील एक अतिशय महत्वाचा दिवस. संपूर्ण वर्षभर हा दिवस ‘‘एकात्मता दिवस‘‘ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून आपल्या तालुक्यामध्ये हा मेळावा शनिवार दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यतच्या वेळेत साईमंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे.

यावेळी ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सेवानिवृत्ती धारकांचा सत्कार करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. तसेच सदर मेळाव्यामध्ये वेंगुर्ला होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या सहकार्याने प्राथमिक आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्याचा लाभ वेंगुर्ला तालुका सेवानिवृत्त कर्मचारी असोसिऐशन सर्व सदस्यांनी घ्यावा.

यासंदर्भात अधिक माहितीसाठी – ९४२३३००९९१ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष रमेश पिंगुळकर, सचिव जयराम वायंगणकर, उपाध्यक्ष बाबली वायंगणकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here