मालवण- मालवण येथे राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे 17 व 18 डिसेंबर रोजी चिवला बिच, आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने होत आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता मामा वरेरकर सभागृह, मालवण येथे आहे. महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या मान्यतेने 12 वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-आनंदयात्रीच्या-वक्तृत/
शनिवार दिनांक 17 रोजी सकाळी 7 वाजता स्पर्धा आरंभ होणार आहेत. रविवार दिनांक 18 रोजी सकाळी 6 वाजता सागरी जलतरण स्पर्धा आरंभ होणार असून दुपारी 1 वाजल्यापासून बक्षिस वितरण समारंभ व स्पर्धा समारोप होणार असल्याचे, मालवण नगरपरिषदेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी संतोष जिरगे यांनी कळविले आहे. या स्पर्धेमुळे जलतरण संघटनेच्या सागरी जलतरण क्षेत्रातील नवनवीन प्रयत्नांना प्रोहत्सान मिळेल यास स्पर्धेत सहभागी होण्याऱ्याची मनोधैर्य उंचावण्यसाठी मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन, अध्यक्ष श्रीकृष्ण (दिपक) परख, सचिव राजेंद्र पालकर यांनी केले आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-news-निर्भया-निधीतील-वाहने/


