Sindhudurg:वेंगुर्ले तालूक्यात ४६ हजार २५ मतदारांपैकी ३२ हजार ४८३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला

0
85
वेंगुर्ले तालूक्यात ४६ हजार २५ मतदारांपैकी ३२ हजार ४८३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

वेंगुर्ले (प्रतिनिधी)-तालुक्यातील ८१ मतदान केंद्रावर सकाळी साडेसात ते अकरा या वेळेत २७ टक्के, साडेअकरा ते दीड यावेळेत ४५ टक्के, दीड ते साडेतीन पर्यंत ५९ टक्के व साडेतीन ते साडेपाचपर्यंत एकूण ७५ टक्के मतदान झाले. आडेली-खुटवळवाडी मतदान केंद्रावर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास यंत्रात बिघाड झाल्याने काहीकाळ मतदानात व्यक्तय आला. आडेली येथे उमेदवार जास्त असल्याने एकाच यंत्रात सर्व उमेदवार मावत नसल्याने दोन यंत्रे देण्यात आली होती. दुस-या मतदान यंत्रात फक्त एकाच उमेदवाराचे नाव होते. त्यामुळे काही मतदारांचा गोंधळ झाला. वेतोरे-वरचीवाडी आणि भोगवे येथेही मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काहीवेळ मतदानात व्यत्यय आला.https://sindhudurgsamachar.in/kokan-कळसुलीत-बिबट्याचा-मुक्त/

सरपंचपदासाठी रेडी ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक दहा उमेदवार निवडणूक रिगणात उभे होते. वेंगुर्ला तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीसाठी निवडणूकीची प्रक्रिया जाहीर झाली होती. यात पाल ग्रामपंचायत बिनविरोध तसेच वेतोरे गावातील वरचीवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच निवड बिनविरोध झाली. दरम्यान, आज २१ ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी आणि २२ ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी झालेल्या निवडणूकीत सुमारे ७०.५७ मतदान झाले. तालुक्यातील २१ सरपंच पदासाठीच्या ७५ व १६२ सदस्य पदासाठीच्या ३७१ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान पेटीत बंद झाले. यात एकूण ४६ हजार २५ मतदारांपैकी ३२ हजार ४८३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here