Maharashtra: सामाजिक कार्यासाठी  नूतन गुळगुळे यांचा ‘अवर नॉर्थ ईस्ट (O.N.E.) वन इंडिया अवॉर्ड २०२२’ ने गौरव!

0
122
सामाजिक कार्यासाठी  नूतन गुळगुळे यांचा 'अवर नॉर्थ ईस्ट (O.N.E.) वन इंडिया अवॉर्ड २०२२' ने गौरव!

मुंबई – खर तर दिव्यांग या शब्दाचा अर्थ कोणाला विचारला तर तो पटकन कोणाला सांगता येणार नाही. पण ‘अपंग’चा अर्थ सहज कोणीही सांगू शकेल. शरीराने विकलांग असलेली व्यक्ती म्हणजे अपंग. इतरांच्या मदती शिवाय काहीही करता येत नाही, अश्या ‘अपंगांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी लढाऊ ‘माय’ अशी ओळख निर्माण करण्यात यशस्वी होत असलेल्या सौ. नूतन गुळगुळे (संस्थापक,अध्यक्षा नूतन गुळगुळे फाऊंडेशन) यांचा त्यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक कार्यासाठी ‘माय होम इंडिया’ या संस्थेने ‘वन इंडिया अवॉर्ड – २०२२’ देऊन सन्मान केला. नुकताच मुंबई येथे संपन्न झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात त्यांचा हा सन्मान अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री मा. श्री पेमा खांडू यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जेष्ठ गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्याला विशेष उपस्थितांमध्ये अरूणाचल विकास परिषदेचे अध्यक्ष तेची गुबिन, भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि ‘माय होम इंडिया’चे संस्थापक सुनील देवधर उपस्थित होते.

नूतन गुळगुळे

“नूतन गुळगुळे या मातेचा प्रेरणादायी प्रवास थक्क करणारा आहे. स्वतःच्या जन्मजात दिव्यांग मुलासोबतच समाजातील अनेक दिव्यांगग्रस्त आणि विकलांग मुलांना समाज प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. अश्या कर्तुत्ववान महिला आपल्या भूमीत जन्माला येतात, हे महाराष्ट्राचे भाग्यच म्हणावे” असे गौरौद्गार  माय होम इंडियाचे संस्थापक आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी या प्रसंगी बोलताना काढले. पुढे ते म्हणाले, “या मातीत दिव्यांग मुलांसाठी अनेक मातांनी भव्य दिव्य योगदान दिले आहे. आजच्या आधुनिक युगात दिव्यांग मुलांसाठी दिव्य कार्य करणाऱ्यात सौ. नूतन विनायक गुळगुळे यांचे नाव आदराने घेतले जात असून, त्यांच्या पुढील कार्याद्वारे ते आणखीन पुढे जात राहील अशी अशा करतो.” 

 ‘नूतन गुळगुळे फाउंडेशन’ची महाराष्ट्रात बहुविकलांग व्यक्तींसाठी काम करणारी एक प्रख्यात सेवाभावी संस्था अशी ओळख निर्माण झाली असून गेली सात वर्ष ‘ध्येयपूर्ती पुरस्काराने देशातील अनेक बहुविकलांग बहुगुणी व्यक्तींचा सन्मान नामांकित मान्यवरांच्या हस्ते करण्याचे काम त्यांच्या संस्थेद्वारे केले जात आहे. कोरोनामुळे पालक गमावलेल्या  ‘दिव्यांग’  बालकांकरिता विरार, अर्नाळा येथे वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्राची निर्मिती ‘नूतन गुळगुळे फाऊंडेशनद्वारे करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत काम करणाऱ्या ‘दिव्यांग कल्याण आयुक्तालया’ने या उपक्रमास मान्यता आहे. ‘करोना–१९’मुळे पालकत्व गमावलेल्या ग्रामीण महाराष्ट्रातील ‘दिव्यांग’ बालकासह त्याच्या एकल पालकाच्या’ निवासाची व्यवस्था, मार्गदर्शन, आरोग्य सेवा, शिक्षण इत्यादी देणारे भारतातील हे पहिले वसतिगृह असून येथे ४० दिव्यांग मुलांच्या निवासाची व्यवस्था असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here