कणकवली । वार्ताहर
कणकवली तालुक्यातील पहिल्या दोन फेरीतील 20 गावांचा ग्रामपंचायतचा निकाल जाहीर झाला आहे. त्या 20 गावांमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता 12 ग्रामपंचायतीवर तर शिवसेना 6 ग्रामपंचायत आणि गाव विकास पॅनल 2 ग्रामपंचायतीवर सत्ता प्रस्थापित केली आहे. भाजपाचे सरपंच सावडाव, तरंदळे,आशिये, कासरल, बोर्डवे, तिवरे,बिडवाडी,दारीस्ते,डामरे, पियाळी, वरवडे, कुरंगवणे तर शिवसेना ठाकरे गट कोळोशी, आयनल, सातरल, वाघेरी, कसवण, तळवडे, शिवडाव आणि गाव पॅनल चिंचवली,दारुम आदी गावांमध्ये पक्षीय सत्ता प्रस्थापित झाली आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-राजापूर-विधानसभा-मतदार-स/
मंत्री केसरकरांना धक्का; ठाकरे गटाचा दोन ग्रामपंचायतींवर विजय
सावंतवाडी । वार्ताहर
तालुक्यात पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल लागले असून आजगाव भोमवाडी ग्रामपंचायतमध्ये ठाकरे गटानं खातं उघडलं आहे. सरपंचपदी अनुराधा वराडकर निवडून आल्या आहेत. तर जिल्ह्यात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्या सावंतवाडी तालुक्यातील केसरी ग्रामपंचायतवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. ही ग्रामपंचायत अनेक वर्षे शिंदे गटाचे माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत यांच्या ताब्यात होती.
या ग्रामपंचायत निवडणुकीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सावंतवाडी तालुक्यातील पहिल्या टप्प्यात दहा ग्रामपंचायतचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये मडूरा केसरी शिरशिंगे पडवे माजगाव या ग्रामपंचायतवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.
तर गावविकास पॅनेल ने गुळदुवे व निरगुडे गाव विकास पॅनेलने ग्रामपंचायतीवर तसेच शिवसेना ठाकरे गटाने भोमवाडी तसेच सातार्डा ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवलं आहे.