नागपूर– विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाच्या कामकाजाला आज सुरुवात झाली. यावेळी भाजप नेते तथा राज्याचे वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर, तंत्रज्ञांच्याच्या भरतीसंदर्भात मोठी घोषणा केली. राज्यात लवकरच डॉक्टर, तंत्रज्ञांच्या 4 हजार जागांवर भरती करण्यात येणार असून ही भरती प्रक्रिया टीसीएसच्या माध्यमातून पार पडणार असल्याचे मंत्री महाजन यांनी म्हंटले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-संत-राऊळ-महाराज-महाविद्/
नागपूर येथे सुरू असलेल्या विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून या अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधकांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. यावेळी अधिवेशनाच्या सुरुवातीला मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर, तंत्रज्ञांच्या पदांच्या भरतीसंदर्भात माहिती देत घोषणा केली. यावेळी महाजन म्हणाले, आम्ही MPSC च्या माध्यमातून 300 डॉक्टर भरले आहेत. सध्या 28 टक्के पदे रिक्त आहेत. या संदर्भात आम्ही मेडिकल बोर्ड तयार करणार आहोत आणि त्या माध्यमातून लवकरच पदभरती करण्यात येईल. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असं सांगितलं.