Sindhudurg: राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त नविन व्यावसायीक आव्हानांबाबत विस्तृत विवेचन

0
142

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला तहसिलदार कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन नायब तहसिलदार लक्ष्मण फोवकांडे या अध्यक्षतेखाली, पुरवठा विभागाचे अधिकारी प्रितम वाडेकर व वेंगुर्ला तालुका रास्त भाव धान्यदुकानदार संघटनेचे अध्यक्ष तात्या हाडये यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-जिल्हास्तरीय-शालेय-करा/

नायब तहसिलदार लक्ष्मण फोवकांडे यांनी ग्राहकांचे हित, आवश्यक ग्राहकिय ज्ञान व ग्राहक म्हणून असलेली कर्तव्ये याबाबत तर पुरवठा अधिकारी प्रितम वाडेकर यांनी, ग्राहक दिनाचे महत्त्व, ग्राहकांची सजगता याबाबत मार्गदर्शन केले. ग्राहकांचे अधिकार व कर्तव्ये याबाबत पुरवठा लिपिक सतीश हराळे यांनी आपले अनुभव कथन केले. तालुका धान्यदुकानदार संघटनेचे अध्यक्ष तात्या हाडये यांनी गेली २५ ते ३० वर्षे रास्त भाव धान्यदुकानदारीच्या माध्यमातून ग्राहक या नात्याने लोकांना दिलेली सेवा व आपले अनुभव तसेच नवीन येणारी व्यावसायिक आव्हाने व उपाय योजना याबाबत विस्तृत विवेचन केले.

फोटोओळी – राष्ट्रीय ग्राहक दिनाचे उद्घाटन तालुका धान्यदुकानदार संघटनेचे अध्यक्ष तात्या हाडये यांच्या हस्ते झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here